जम्मू काश्मीरच्या किश्तवाडात ढगफुटीची घटना घडली आहे. ढगफुटी झाल्यानं 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. किश्तवाडात ढगफुटीमुळे हाहाकार माजला आहे. सध्या बचावकार्य सुरु आहे. मचैल माता मंदिराजवळील तंबू वाहून गेल्याची माहिती समोर येतेय. जम्मू-चूशोती परिसरातही बचावकार्याला सुरुवात झाली आहे.