Kandivali Gas cylinder Chori | कांदिवलीत 27 गॅस सिलिंडरची चोरी, 27 पैकी 12 गॅस सिलिंडर जप्त

कांदिवली पश्चिम येथील काकाजी केणी चौक परिसरात पार्क केलेल्या टेम्पोतून 27 गॅस सिलेंडर चोरी झाले.. या प्रकरणाचा चारकोप पोलिसांनी उलगडा केला.. यात एका आरोपीला अटक करण्यात आलीय.. या कारवाईत सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी नंदकुमार सोनी यांनी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.. 25 मार्च रोजी रात्री 11 ते 26 मार्च रोजी सकाळी 8 या दरम्यान टेम्पोतून HP कंपनीच्या एकूण 27 गॅस सिलेंडरची चोरी झाली होती.. या तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला.. त्यानंतर पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथून ३२ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलं.. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला टेम्पो तसेच चोरीस गेलेल्या 27 पैकी 12 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेत.. तर जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 6 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितलं...

संबंधित व्हिडीओ