मीरा-भाईंदरमधील नगररचना विभागाविरोधातील तक्रारींवरून परिवहन मंत्री आणि आमदार प्रताप सरनाईक आक्रमक झाले आहेत... लोकप्रतिनिधी जनता दरबार घेतात, मात्र नगररचना विभागाशी संबंधित तक्रारी सोडवण्यासाठी दर महिन्याला ‘तक्रारदार दरबार’ भरवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.... नगररचना विभागातील काही प्रकरणांमध्ये दबावाखाली प्रशासन काम करत असल्याच्या तक्रारी आल्याचा दावा सरनाईक यांनी केला. तसेच महानगरपालिकेतील नगररचना आणि विधी विभाग हे सर्वात भ्रष्ट विभाग असल्याचा गंभीर आरोप करत, पदांचा दुरुपयोग करून बांधकाम परवानग्या दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.