चिंचपोकळीच्या Chintamani सकाळी 10 वाजता विसर्जन मिरवणूक सुरू होणार, भजन-आरतीत रंगणार विसर्जन

चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जन मिरवणुकीला उद्या सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. भावना, भक्ती आणि शिस्त यासाठी ओळखली जाणारी ही मिरवणूक दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 सप्टेंबरला सकाळी 7 वाजता गिरगाव चौपाटीवर पोहोचणार आहे. बाप्पा मंडपातून बाहेर पडताच संपूर्ण परिसर गुलाल आणि भगव्या रंगात न्हाऊन निघतो.. विशेष म्हणजे कोणत्याही डीजेशिवाय केवळ पारंपरिक भजने आणि आरतीच्या तालावर हजारो भाविक ही मिरवणूक पुढे नेतात. एकसुरात होणारी आरती हेच चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जनाचं सर्वात मोठं आकर्षण मानलं जातं.

संबंधित व्हिडीओ