ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी प्रदीप पूर्णेकरांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.. त्याचबरोबर त्यांनी पूर्णेकरांच्या कुटुंबाचं सांत्वन केलंय.हल्ल्याच्या एक महिना आधीच त्यांनी काही शंका व्यक्त केल्याचा दावाही पेडणेकरांनी केला.. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, आरोपींना अटक झाली, मात्र आरोपपत्र कधी दाखल होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला.. तर दुसरीकडे विशाखा राऊत यांनी जात प्रमाणपत्राच्या वादाचा उल्लेख करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.. माझे जात प्रमाणपत्र महाराष्ट्राचे होते, तर मीनाक्षी शिंदे यांचे प्रमाणपत्र कर्नाटकचे होते, मग ते कसं मान्य झालं असा सवाल त्यांनी केला.. या प्रकरणात प्रदीप पुर्णेकर पाठपुरावा करत होते, असंही राऊत म्हणाल्या. दरम्यान, हत्येमागे हेच कारण आहे का, या दिशेने तपास सुरू असल्याचाही दावा विशाखा राऊत यांनी केला.