लातूर शहरातील कव्हा नाका परिसरात स्कॉर्पिओ कार पेटवून दिल्याची घटना समोर आलीय.. अज्ञात व्यक्तींनी गाडीला आग लावल्याची माहिती आहे. जुन्या वादातून गाडी पेटवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे, गाडी पेटवण्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय.. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी तपास सुरू आहे.