लातूरमध्येही दुष्काळ पडल्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांपुढेही आर्थिक संकट उभं राहिलय.. शेतात काम नाही म्हणून अनेक शेतमजूर स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत. साखर कारखान्यांनी चार महिन्याऐवजी आता दोन महिनेच काम असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या मजूरांना मुंबईकडे स्थलांतरित होण्यापलिकडे पर्याय उरला नाही. लातूरच्या अहमदापूर गावातून शेतमजूरांची परिस्थिती जाणून घेतली आहे आमच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी