Latur Drought|मनकाबाईंवर दु:खासह दुष्काळाचा घाला, मुलगा-सून गमावले; कर्जाचा डोंगर, कर्ज फेडायचं कसं?

दुष्काळाने बळीराजाला पुरतं रडवलंय. अशात लातूरच्या मनकाबाई लोंढेंवर तर नैसर्गिक संकटासह कौटुंबिक दु:खाचाही डोंगर कोसळलाय. मदनसुरी गावात राहणाऱ्या ६० वर्षीय मनकाबाई लोंढे... मुलाच्या आजारपणासाठी कर्ज घेतलं. पण मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा महिन्यांत सुनेनंही आत्महत्या केली. अशा दुहेरी दु:खातून जाणाऱ्या मनकाबाईंवर आता दुष्काळानेही घाला घातलाय. शेतमजुरू करणाऱ्या मनकाबाईंच्या हाताला आता कामही मिळत नाहीय. त्यामुळे डोक्यावर असलेलं कर्ज फेडायचं कसं या चिंतेनं त्यांना ग्रासलंय. दुष्काळाने मनकाबाईंच्या जगण्याचा संघर्ष आणखी कठीण केला आहे. Drought in Latur | Mankabai faces the double blow of personal tragedy and drought: she has lost her son and daughter-in-law, and is now burdened by a mountain of debt—how will she ever repay it?

संबंधित व्हिडीओ