विधानपरिषद निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातल्या 17 पैकी 6 जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवलाय. तेव्हा आता उद्या 11 जागांची मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत सुरुवातीपासूनच नाट्यमय घडामोडी घडल्या. संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली.. इथे महायुतीचे सुहास शिरसाठ, महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे आणि अपक्ष उमेदवार इसाक खान यांच्यात तिरंगी लढत आहे. नाशिकमध्ये दराडे की गिते? याचा फैसला दुपारी 12 वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे.