राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे.मविआमधले बरेचसे नेते महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे दावे महायुतीकडून केले जातायत.मात्र महायुतीतल्या या इनकमिंगमुळे महायुतीतच कुरबुरी सुरू होण्याची चिन्हं आहेत.कारण कुणाला पक्षात घ्यायचं, याबद्दल महायुतीमधल्या तीनही पक्षाचे स्वतःचे डावपेच आहेत.या इनकमिंगमुळे मविआमधल्या पक्षांचं नुकसान होईलच पण भविष्यात महायुतीमध्येच या इनकमिंगवरुन वाद होण्याची शक्यता जास्त आहे.