शनिवारी म्हणजे उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण पुढील वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याआधी आज त्यांनी चालू आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला. अर्थिक पाहणी अहवाल हा पुढील वर्षाच्या अर्थिक परिस्थितीची जाणीव करुन देणारा दस्तावेज असतो, त्यातून चिंताही व्यक्त केली जाते, मात्र शेअर बाजाराने अहवाल सादर झाल्यानंतर चांगलीच उसळी घेतलीय. निफ्टी आज साधारण १ टक्का म्हणजे 250 अंकांनी तर सेन्सेक्स जवळपास 750 अंकांनी उसळलाय. पाहुयात खास रिपोर्ट.