केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय खासदार आणि आमदारांना बोलावण्यात आले आहे. महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लेखी पत्राद्वारे लोकप्रतिनिधींना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.