राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.कोकण विभागाला ऑरेंज तर विदर्भ आणि मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आला.