Mahashivratri 2026 | Beed | जय शिवशंभूचा गजर, परळीच्या वैजनाथ मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी

बीडच्या परळी येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभुवैद्यनाथाचं महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी वाढत असून जय शिवशंभूचा गजर परिसरात निनादत आहे.आज दिवसभरात लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेणार आहेत. त्यामुळे भाविकांसाठी सुविधा मंदिर संस्थांकडून उपलब्ध करून देण्यात आल्यात.याबरोबरच पोलीस प्रशासनाकडून देखील शहरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.मंदिर परिसरात विविध सेवाभावी संस्थांकडून उपवासाचे पदार्थ देखील वाटप केले जात असून रात्री उशिरापर्यंत दर्शन रांगा सुरू राहतील, अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली.

संबंधित व्हिडीओ