Andheri Metro स्टेशनबाहेर भटक्या कुत्र्याचा विद्यार्थ्यावर हल्ला, चेहऱ्यावर आणि डोळ्यांना दुखापत

मुंबईतही भटक्या कुत्र्यांचा हैदोस पहायला मिळतोय. मुंबईतील अंधेरी मेट्रो स्टेशनबाहेर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केलाय. या हल्ल्यात कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यामुळे त्याला सरकारी रुग्णालयांमध्ये तातडीने हलवण्यात आलं तसंच पुढील उपचारांसाठी सर जे. जे. रुग्णालयातील तज्ज्ञांना बोलावण्यात आलंय. मूळचा बिहारचा असलेला हा विद्यार्थी, मुंबईतील एका लॉ ऑफिसमध्ये इंटर्नशिप करत कायद्याचा अभ्यास करत आहे. मेट्रो स्टेशनमधून बाहेर पडल्यावर तो एका मित्रासोबत चालत होता, तेव्हा कुत्र्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. Stray dog ​​attacks student outside Andheri Metro station; injuries to face and eyes.

संबंधित व्हिडीओ