गणेशोत्सवाचे औचित्य साधून मनमाडच्या इंदिरा नगर कॉलनीतील महिलांनी एकत्र येत सिद्धीविनायक गणेश मंदिराला लाडक्या गणरायाला 56 भोग नैवेद्य दाखविला. गेल्या अनेक वर्षांपासून महिला स्वतःच्या हाताने बनविले विविध पदार्थ नेवैद्य म्हणून दाखविण्याची परंपरा जोपासत आहे. गणपती आवडणाऱ्या मोदकां बरोबरच विविध प्रकाराच्या गोड तिखट पदार्थांचा या नवैद्यांमध्ये समावेश असतो. हे सर्व पदार्थ नंतर गणेश भक्तांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात येतात.