सिंधुदुर्गातील मालवणच्या देवलीतील चव्हाण कुटुंबाने आपल्या बाप्पासाठी प्राचीन दगडी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. त्यामुळे वासुदेव चव्हाण ह्यांच्या घरच्या बाप्पाची पंचक्रोशीत चर्चा आहे. ह्या कुटुंबियांच्या बाप्पाची मूर्तीही लक्षवेधक आहे. दरवर्षी वेगवेगळी आरास करणाऱ्या आणि सुंदर मूर्ती असणाऱ्या ह्या बाप्पाच्या दर्शनासाठी दूरवरून लोक येतात. गेल्या अनेक वर्षांपासून चव्हाण कुटुंब एकत्र येऊन मनोभावे बाप्पाचा उत्सव साजरा करतंय.