Akola| दुष्काळ जाहीर करा, सरकारला 5 ऑक्टो.पर्यंतचा अल्टिमेटम,ठाकरे गटाचा मोर्चा; शेतकरीही रस्त्यावर

पश्चिम विदर्भातील अकोला जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने अकोल्यात भव्य मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, स्वराज्य भवन येथून निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. आमदार नितीन देशमुख यांनी सरकारला ५ ऑक्टोबरपर्यंत मदत जाहीर करण्याचा अल्टीमेटम दिला आहे. मदत जाहीर न झाल्यास ५ ऑक्टोबरनंतर शेतकऱ्यांसह समृद्धी महामार्ग बंद पाडण्याचा इशाराही दिला आहे. हातात सोयाबीनची झाडे, बैलजोडी आणि भगवे ध्वज घेत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. Akola | Demand to declare drought; ultimatum to the government until October 5; Thackeray faction holds protest march; farmers also take to the streets.

संबंधित व्हिडीओ