Ganeshotsav 2026| शिर्डीत कैलास पर्वताचा भव्य देखावा, कैलास पर्वतावर जात दर्शन घेण्यासाठी गर्दी

साईबाबांच्या पावनभूमीत गणेशोत्सवाच्या निमित्तानं साकारण्यात आलेला तब्बल तीस फूट उंचीचा भगवान भोलेनाथांचा कैलास पर्वत सध्या भाविकांचं लक्ष वेधून घेतोय. शिर्डी शहरातील मध्यवर्ती चौकात स्वराज्य सेनेच्या वतीनं हा भव्य देखावा उभारण्यात आलाय. कैलास पर्वतावर जाऊन भगवान भोलेनाथांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होतेय. गेल्या चाळीस वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जातोय. भक्ती, कल्पकता आणि कलाकुसरीचा अनोखा संगम असलेल्या या कैलास पर्वताच्या देखाव्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी

संबंधित व्हिडीओ