मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत...धाराशिव शहरातील भवानी चौकात मराठा आंदोलकांनी गेल्या दोन तासांपासून सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग रोखत रस्त्यावर टायर जाळले आहेत....यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. तर सरमकुंडी येथे गेल्या एक तासापासून मराठा समाज बांधवांनी महामार्ग रोखून धरला आहे...यामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे... जिल्ह्यात मराठा आंदोलनाची ढग चांगलीच वाढली असून आंदोलन हिंसक वळण घेत आहे.
Maratha protesters turn aggressive on the Solapur-Dhule National Highway; highway blocked for over two hours.