Ratnagiri च्या Khed मधील दहिवलीत भीषण भूस्खलन; अनेक जण अडकले, एकाची सुटका

रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका खेड तालुक्याला बसलाय.. दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री भीषण भूस्खलनाची घटना घडली. या दुर्घटनेत घराचा काही भाग कोसळून तिघेजण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यापैकी ७५ वर्षीय कल्पना शेलार यांची ग्रामस्थांनी तत्परतेने सुखरूप सुटका केली असून त्यांच्यावर कळबणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र ८५ वर्षीय शांताराम बाळा शेलार आणि ३५ वर्षीय सतीश शेलार यांचा शोध मंगळवारी उशिरापर्यंत सुरू होता.

संबंधित व्हिडीओ