राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पनवेल ते खोपली या दरम्यान लाल परीने प्रवास केलेला आहे. त्यांनी पनवेल खोपोली बस स्थानकाला अचानक भेट दिली आहे आणि त्यावेळी त्यांनी बस स्थानकाची सविस्तर पाहणी सुद्धा केली आहे. दरम्यान नवीन पाच हजार इलेक्ट्रिक बसेस तीन हजार डिझेल बसेस सह सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं विधान सरनाईक यांनी केलेलं आहे.