भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने सर्व देशावर शोककळा पसरली आहे. फाळणीच्या काळात पाकिस्तानातून भारतात आलेल्या डॉ. सिंग यांनी आपल्या कर्तृत्वाने सर्व जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. परंतु पाकिस्तानातील आपल्या मुळ गावी ज्या शाळेत डॉ. सिंग इयत्ता चौथीपर्यंत शिकले त्या शाळेला भेट देण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी हा हृदयद्रावक प्रसंग सांगितला.