एकीकडे विरोधक एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनामा करता आंदोलन करत असताना बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट एमपीएससी आयोग बरखास्त करण्याची मागणी करत यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचं वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच यात एमपीएससी आयोगाच्या सदस्यांनी पेपर फोडल्या चा त्यांनी आरोप केला आहे. तसेच या सदस्यांना सरकारने पाठीशी घालू नये असेही त्यांनी मत व्यक्त केला आहे.