नायगाव रेल्वे स्थानकात छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला चालत्या लोकलखाली ढकलल्याच्या धक्कादायक घटनेनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीच्या नगरसेविकांनी वसई रेल्वेच्या एसीपी मनीषा रावखंडे यांची भेट घेत निवेदन दिले. रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासह महिलांसाठी अधिक कडक उपाययोजनांची मागणी यावेळी करण्यात आली.