Satara Fire News| संशयित आरोपींना घेऊन जाणारी Police van पेटली, साताऱ्याच्या कराड शहरातील घटना

साताऱ्याच्या कराड शहरात संशयित आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. शहरातील मुख्य भेदा चौकात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. या व्हॅनमध्ये पाच ते सहा संशयित आरोपी आणि चार ते पाच पोलीस कर्मचारी प्रवास करत होते.. दरम्यान, व्हॅनमधून अचानक धूर येऊ लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली. त्यानंतर सर्व पोलीस कर्मचारी आणि संशयित आरोपींना तातडीने खाली उतरवण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, भर चौकात पोलीस व्हॅनला आग लागल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

संबंधित व्हिडीओ