ठाणे शहरातील पाणी, वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्यांच्या प्रश्नांवरून मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेचा आज ठाण्यात संयुक्त मोर्चा निघणार आहे. गडकरी रंगायतन येथून ठाणे महापालिकेवर धडकणाऱ्या या मोर्चासाठी भव्य तयारी करण्यात आली आहे. महापालिका मुख्यालयासमोर मोठा मंच, रोषणाई आणि ध्वनिवर्धकाची व्यवस्था करण्यात आली आहे.