Mumbai| Overloading माफियांची मुजोरी सुरूच, 'मराठी कामगार सेनेचा' चक्का जामचा इशारा

परिवहन आयुक्तांच्या आदेशाला हरताळ फासत मुंबई सह उपनगरात ओव्हरलोडिंग करणाऱ्या वाहनांची मुजोरी सुरूच आहे. भरारी पथके कागदोपत्रीच असून एजंट आणि माफियांशी साटेलोटे असल्याचा आरोप मराठी कामगार सेनेने केला आहे. ​याविरोधात आक्रमक होत मराठी कामगार सेनेने ओव्हरलोडिंग तात्काळ न थांबवल्यास मुंबईसह उपनगरात तीव्र ‘चक्का जाम’ करण्याचा इशारा दिला असून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

संबंधित व्हिडीओ