बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलने 21 पैकी 21 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तिरंगी लढतीत सभासदांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या विश्वासावर शिक्कामोर्तब केलाय.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बंडखोरी करत भाजपच्या मदतीने स्वतःच पॅनल उभा केलेल्या पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनल ला सभासदांनी धूळ चारली आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पॅनलचा देखील या निवडणुकीत दारून पराभव झाला आहे.राष्ट्रवादीच्या विक्रम भोसलेंनी बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगताप यांचा पराभव केलाय. बंडखोरी केल्यामुळे लोकांनी पुरुषोत्तम जगतापांना नाकारल्याचं विक्रम भोसलेंनी सांगितलंय. तर राष्ट्रवादीच्या पॅनलनं पैसे वाटल्यानं पराभव झाल्याचं पुरुषोत्तम भोसलेंनी NDTVशी बोलताना सांगितलंय.