MPSC आंदोलनात हाती काहीच पडलं नाही, Sushma Andhare यांच्या वक्तव्यावर Rohit Pawar यांची प्रतिक्रिया

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर तोडगा निघाला असून सरकारने पेपरफुटी प्रकरणात चौकशी समितीची नेमणूक केली आहे. विशेष म्हणजे, या चौकशी समितीच्या सचिवपदी सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंची नियुक्ती करण्यात आली. रोहित पवारांच्या नेतृत्वात हे आंदोलन आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं. मात्र त्यांच्याच मित्रपक्षातील ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारेंनी एमपीएससीच्या आंदोलनात काहीच हाती लागलं नसल्याचं सांगत आंदोलनावर प्रश्न उपस्थित केलाय. एमपीएससी आंदोलकांनी आंदोलन स्थगित केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी नाराजी व्यक्त केलीय.. आपण युद्धात जिंकलो आणि तहात हरलो अशी टीका त्यांनी केलीय.. तर 800 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय..

संबंधित व्हिडीओ