Pimpri-Chinchwad मध्ये छटपूजेसाठी बांधलेले चौथरे पालिकेनं हटवले, कारवाईनंतर उत्तर भारतीय काय म्हणाले

पिंपरी-चिंचवड शहरात छटपूजा विधीसाठी नदीघाटांवर नियम डावलून उभारण्यात आलेले बेकायदेशीर यज्ञ-चौथरे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने अखेर कारवाई करत उद्ध्वस्त केले आहेत. छटपूजेदरम्यान घाटांवर कोणतेही पक्के बांधकाम करू नये आणि नदीपात्रात निर्माल्य टाकू नये, अशा स्पष्ट सूचना महापालिका प्रशासनाने यापूर्वीच दिल्या होत्या; मात्र प्रशासनाचे आवाहन व नियमांकडे दुर्लक्ष करून काही भाविकांकडून नदीपात्रात अनधिकृत चौथरे उभारण्यात आल्याचे समोर आले. याची गंभीर दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागातील कर्मचाऱ्यांनी तातडीने धडक कारवाई करत हे सर्व अनधिकृत बांधकाम हटविले आणि नदीपात्रातील अतिक्रमण पूर्णपणे साफ केले.

संबंधित व्हिडीओ