नागपूरसह संपूर्ण विदर्भात यंदा पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. नागपूर जिल्ह्यात तब्बल ३६ टक्के कमी पाऊस झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेती पिकांना बसला आहे. पेवठा गावातील शेतांमध्ये सोयाबीन पिकांची वाढ खुंटली असून, सोयाबीनचा बारही कमी आणि सडका झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर वर्षभराची मेहनत वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.यासंदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी