विदर्भात चार एक्स्प्रेस वे महामार्गांचं जाळ तयार केलं जाणार आहे. समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यासाठी विदर्भात तीन रस्ते प्रकल्प हाती घेतले आहेत. नागपूर–गोंदिया, नागपूर–चंद्रपूर आणि भंडारा–गडचिरोली या तीन एक्सप्रेस हायवे महामार्गांचा यात समावेश आहे. याशिवाय, खनिज वाहतुकीला वेग देण्यासाठी नवेगाव मोर–सुरजागड द्रुतगती महामार्ग उभारण्याचाही निर्णय घेण्यात आलाय. सुमारे ४६ हजार कोटींच्या या चारही प्रकल्पांच्या बांधकामासाठी टेंडर काढण्यात येणार आहेत. या चारही प्रकल्पांची कामे नवीन वर्षात सुरू करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन असल्याची माहीत आहे.
Nagpur | A network of four expressways to be developed in Vidarbha; tenders to be invited for projects worth ₹46,000 crore.