नाशिकमध्ये गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबतची महापालिका प्रशासनाची बैठक अखेर आज पार पडली.महापालिका प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत गणेश मंडळांनी यापूर्वी बैठकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र चर्चा आणि समन्वयानंतर आजच्या बैठकीला गणेश महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित राहिले.या बैठकीला महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर, आमदार देवयानी फरांदे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवादरम्यान खड्डेमय रस्ते, वाहतुकीतील अडथळे, परवानग्या मिळण्यात होणारा विलंब आणि इतर नागरी समस्यांबाबत पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासमोर नाराजी व्यक्त केली.