Nashik news l सुदर्शन लॉन्सजवळ रस्त्यावर मोठे भगदाड, हुंबा डेअरीसमोरील मार्ग धोकादायक l NDTV Marathi

नाशिकच्या पालिका आयुक्त मनिषा खत्रींनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एकतरी खड्डा दाखवा नाव बदलेल असं चॅलेंज दिलं होतं.आता नाशिकच्या पालिका आयुक्तांना नाशिकच्याच रस्त्यांवर पडलेलं भगदाड NDTVच्या मार्फत दाखवणार आहोत. नाशिकमधील इंदिरानगर परिसरातील सुदर्शन कॉलनीमधील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सुदर्शन लॉन्सजवळ रस्त्यावर मोठे भगदाड पडले आहे. हुंबा डेअरीसमोरील या भगदाडामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हे भगदाड स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. अद्याप महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले नाहीत. त्यामुळे प्रशासन आणखी किती वेळ या समस्येकडे दुर्लक्ष करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. घटनास्थळावरून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी. Nashik News Large sinkhole on the road near Sudarshan Lawns; route opposite Humba Dairy hazardous.

संबंधित व्हिडीओ