नाशिकमध्ये बांगलादेशी नागरिकाकडे दोन पासपोर्ट आढळलेत. बांगलादेशी नागरिकांच्या पोलीस तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुमन गाजी याने दोन्ही देशांच्या काही एजंटांना हाताशी धरून हे पासपोर्ट बनवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. बारा वर्षापूर्वीच सुमन गाजी हा भारतामध्ये आला होता. आणि गेल्या आठवड्यात आठ बांग्लादेशी नागरिकांना नाशिक पोलिसांनी अटक केली होती.