NDTV मराठीच्या बातमीचा Impact, आंबेगाव-जुन्नरचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश; याचसंदर्भातला आढावा

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले होते. मात्र, उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांमध्ये भात, सोयाबीन, उडीद तसेच इतर नगदी पिके धोक्यात आली होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते. शेतकऱ्यांची ही व्यथा एनडीटीव्ही मराठीने सातत्याने मांडली होती. अखेर उर्वरित ३०५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले असून, यामध्ये आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांचाही समावेश करण्यात आला आहे. एनडीटीव्ही मराठीने शेतकऱ्यांचा प्रश्न सातत्याने लावून धरल्याबद्दल शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी आभार मानले आहेत. यासंदर्भात आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी सुरेश भोर यांच्याशी बातचीत केली. Impact of NDTV Marathi's report: Ambegaon and Junnar included in the list of drought-affected talukas; a review of the situation.

संबंधित व्हिडीओ