विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलीय. सुनील तटकरेंनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. यानंतर आता सुनेत्रा पवारांनी घेतलेल्या भेटीमुळे चर्चा सुरू झाल्यात.. दरम्यान ही भेट शासकीय कामानिमित्तानं झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय. विलीनीकरणासंदर्भात कोणतीही झाली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.