अकोल्यातील अकोट नगरपरिषदेत रस्ता, नाली आणि भिंत बांधकामातील कथित 48 लाख 22 हजार रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणात कंत्राटदार, तत्कालीन मुख्याधिकारी, अभियंता, माजी नगराध्यक्ष आणि तीन माजी नगरसेवकांसह सात जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून अपूर्ण कामांची बिले काढल्याचा आरोप असून, आता नोव्हेंबरअखेर होणाऱ्या सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.