अतिवृष्टी आणि महापुरानं शेतकऱ्यांचं होतं नव्हतं ते सगळं हिरावलं... आणि आता विमा कंपन्याही शेतकऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याऐवजी जखमेवरची खपली काढताना दिसत आहेत. परभणीच्या पालम तालुक्यात विमा कंपन्यांच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आलीय. पीक कापणी प्रयोगावेळी विमा कंपन्यांकडून फसवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय... नेमकं प्रकरण काय आहे? विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या जीवावर कशा उठल्यात? जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट