घाटकोपर च्या अमृतनगर सर्कल येथे सकाळी भरदिवसा दर्शन ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आला. तीन अज्ञात आरोपी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान या ज्वेलर्स च्या दुकानमध्ये घुसले. त्यांनी हे ज्वेलर्सचे शॉप लुटण्याचा प्रयत्न केला, काही दागिने लुटले. मात्र ज्वेलर्स मालक दर्शन मिटकरी यांनी विरोध केला असता त्यांनी त्यांच्यावर वार केले आणि पळून गेले याचेच आता सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. यावेळी त्यांच्यातील दोन जण दुचाकीवर पळून गेले. तर एक जण हातात बंदूक घेऊन पळत निघाला, नागरिकांना भीती दाखविण्यासाठी त्याने त्याच्याकडील बंदुकीतून दोन गोळ्या हवेत झाडल्या आणि इंदिरानगरच्या डोंगरावर पळून गेला. घटना स्थळी फॉरेन्सिक टीम, गुन्हे शाखा, अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त राकेश ओला आणि अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झालेयत