ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा येत्या 20 तारखेला दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानात पार पडणार आहे. यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी देण्यात आलेली आहे .मात्र 24 अटी, शर्ती मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी देताना टाकण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेकडून दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी 19 ऑक्टोबर आणि 20 ऑक्टोबर दसरा मेळावा अशी दोन दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे.शिवाजी पार्कमध्ये ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणारय...त्याआधी शिवसेना ठाकरे गटाकडून वातावरण निर्मितीला सुरुवात झालीय. शिवाजी पार्क परिसरात दसरा मेळाव्याचे बॅनर लागलेत.
Permission granted for the Thackeray faction's Dussehra rally, subject to 24 conditions; banners for the rally have been put up in the Shivaji Park area.