पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे पोहोचले. गेल्या 43 वर्षांनंतर नॉर्वेला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.ऑस्लो विमानतळावर नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोरे यांनी त्यांचे स्वागत केले.आज मोदींची पंतप्रधान स्टोरेंसह द्विपक्षीय बैठक पार पडली.पुढील १५ वर्षांत युरोप आणि नॉर्वे भारतात १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. आणि त्यातून १०लाख रोजगार निर्मितीचं लक्ष्य ठेवण्यात आलंय.