Wardha Rain | महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर वर्धा जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा

Wardha Rain | महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर वर्धा जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा Rain arrives in Wardha district after a month-long wait; farmers relieved. वर्धा जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. पावसाअभावी कापूस, सोयाबीनसह खरीप पिकांवर संकट निर्माण झाले होते. अखेर आज वर्धा शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास तासभर दमदार पाऊस झाल्याने रस्त्यांवर पाणी साचले, तर वातावरणात गारवा निर्माण झाला. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात वर्धासह काही भागातही पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, पिकांना संजीवनी मिळण्यासाठी आणखी दमदार आणि सर्वदूर पावसाची गरज आहे.

संबंधित व्हिडीओ