Jalgaon Gold Rate| सोन्याच्या दरात विक्रमी वाढ,जळगावात सोनं 90 हजारांच्या पार;चांदीचे दर एक लाखांवर

सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली असून सोन्याच्या दर 90 हजारांच्या पार गेले असून चांदीचे दरही एक लाख रुपयांच्या पार गेले आहे.गुरुवारी रात्री जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे भाव 87 हजार 400 रुपयांवर तर जीएसटीसह सोन्याचे भाव 90 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहे.तर चांदीचे भाव 90 हजार 500 रुपयांवर, जीएसटीसह चांदीचे भाव 1 लाख 2 हजार 480 रुपयांवर पोहोचले आहे.दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणाचा सोन्याच्या भावावर परिणाम झालाय.. तर पुढील काळात सोन्याचे भाव 95 हजार रुपये पर्यंत पोहोचण्याचा अंदाज सराफा व्यवसायिकांनी व्यक्त केला आहे.

संबंधित व्हिडीओ