सातारा जिल्ह्यातील कराड येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेत तब्बल ११२ कोटी १० लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं आहे. भाजप नेते शेखर चरेगावकर यांच्यासह ५० जणांवर बोगस कर्ज प्रकरणाच्या माध्यमातून अफरातफर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे आणि निधीचा गैरवापर करून ठेवीदारांचे हित धोक्यात आणल्याचा आरोप आहे.