सेन्सेक्स मधील तेजी आणखी वाढली. शुक्रवारच्या तुलनेत सेन्सेक्स 2300 अंकांनी वधारला तर निफ्टी सुद्धा सातशे अंकांनी उसळला. आयटी आणि बँकिंग या दोन दिग्गज क्षेत्रांमधील शेअर्समध्ये आज जोरदार खरेदी बघायला मिळत आहे सोबतच अदाणी समूहाच्या शेअर्स मध्ये सकाळी असलेली खरेदीची लाट अजूनही कायम आहे. त्याचप्रमाणे युद्धाची शक्यता ओसरल्याने हॉटेल इंडस्ट्री मधील शेअर्स मध्ये शुक्रवारी आलेली विक्री आता खरेदीत बदलली असून हॉटेल इंडस्ट्रीज महत्त्वाच्या शेअर्समध्ये मोठी तेजी बघायला मिळत आहे.