Sindhudurg| महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरील 'बांद्याचा बाप्पा', 65 गावांचं प्रतिनिधित्व करणारा गणपती

तब्बल ६५ वर्षांची भव्य परंपरा लाभलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा सार्वजनिक बाप्पा, म्हणजेच 'बांद्याचा बाप्पा'.​तब्बल ६५ गावांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या बाप्पाच्या दर्शनासाठी दरवर्षी महाराष्ट्र आणि गोव्यातून लाखो भाविक बांदा येथील विठ्ठल मंदिरात हजेरी लावतात. यंदाही या गणेशोत्सवात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहतोय. ​यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने "महाराष्ट्रातील जनता सुखी-समृद्ध राहो, राज्यातील दुष्काळाचे आणि सर्व संकटांचे सावट दूर होवो," असे साकडे बांद्याच्या बाप्पाच्या चरणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि भाविकांनी घातले आहे. चाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी.

संबंधित व्हिडीओ