Bhayandar School | विद्यार्थ्यांच्या डब्यावरुन वाद, भाईंदरच्या तपोवन विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस

Bhayandar School | विद्यार्थ्यांच्या डब्यावरुन वाद, भाईंदरच्या तपोवन विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस Dispute over students' lunchboxes; show-cause notice issued to Tapovan Vidyalaya, Bhayandar. भाईंदरच्या तपोवन विद्यालयात विद्यार्थ्यांच्या डब्यातील खाद्यपदार्थांवरून वाद निर्माण झाला आहे. पर्युषण पर्वाच्या काळात कांदा, बटाटा, अद्रक, बीट आणि गाजर यांसारखे पदार्थ आणल्यास ५० रुपये दंड आकारल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. आता त्यात मेथीच्या भाजीचीही भर पडल्याचा दावा करण्यात येत आहे. मेथीची भाजी डब्यात आणल्याने विद्यार्थ्याला कॅन्टीनमधून दुसरे खाद्यपदार्थ देऊन त्याच्याकडून २० रुपये मागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हा एक प्रकारचा दंड असल्याचा दिसून येत आहे

संबंधित व्हिडीओ