Sound Pollution राज्यातील ध्वनी प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल, सुमोटो याचिका दाखल । NDTV
Sound Pollution: Bombay High Court takes cognizance of noise pollution in the state; suo moto petition filed. | NDTV
राज्यभरात सण उत्सव काळात सुरू असलेल्या तीव्र ध्वनी प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून गंभीर दखल घेतली आहे. सोमवारी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती निला गोखले यांच्या खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेत राज्याच्या महाधिवक्त्यांना पाचारण केले. ध्वनी प्रदूषणाचे नियम काय? त्याची अंमलबजावणी होते का? नियम मोडणाऱ्यांवर काय कारवाई? याचा सविस्तर तपशील उद्या मंगळवारी सादर करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.